Maval : कुसगाव धरणात दहा वर्षीय मुलगा बुडाला

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कुसगाव धरणात (Maval) दहा वर्षांचा एक मुलगा बुडाला. त्याला तात्काळ पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 5) घडली.

आदर्श संतोष गायकवाड (वय 10, रा. हडपसर, पुणे) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. आदर्श हा मावशी पल्लवी साळवे यांच्यासोबत फिरण्यासाठी कुसगाव धरण येथे आला होता. मावशी आणि आदर्श हे धरणाच्या पाण्यात खेळत होते. अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने आदर्श हा पाण्यात बुडाला.

Alandi : आळंदी येथे दृष्टीहीनांचे तीन दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण

याबाबत शिरगाव परंदवडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा यांना दिली. (Maval) दोन्ही संस्थेचे स्वयंसेवक निलेश संपतराव गराडे, भास्कर माळी, अविनाश कार्ले, विनय सावंत, अनिश गराडे, राजाराम केदारी आणि ग्रामस्थांनी आदर्शला पाण्यातून बाहेर काढले. तात्काळ त्याला सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे…

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.