Maval : पवना धरणातून 12 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज- मावळसह पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून धरण 100 टक्के भरलेले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून धरणामधून सकाळी 6 वाजता 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येऊन आज सकाळी सव्वा अकरा वाजल्यापासून 12 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील पवना नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता बाळगावी अशी सूचना पाटबंधारे विभागाने दिली आहे. दरम्यान, मागील 24 तासात पवना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 106 मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या मोसमामध्ये 3337 मिमी पाऊस झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.