Maval Corona News : नवीन 74 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

मावळमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच!

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि.09 )74 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात एकाही जणाला डिस्चार्ज देण्यात आला नाही. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 514 आहे.

शहरी भागात 47 रूग्ण तर ग्रामीण भागात 27 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 28 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 12 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 07 रूग्ण आज सापडले.

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 28,331 झाली आहे. तर दिवसभरात एकही रुग्ण बरा न झाल्याने घरी सोडण्यात आला नाही. रविवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात गहुंजे, कान्हे व कामशेत येथे प्रत्येकी 04 रुग्ण सापडले. तळेगाव दाभाडे (ग्रामीण) येथे 03 रुग्ण सापडले. दारूंब्रे, पाटण, कुसगाव बुद्रुक, देवले, राजपुरी, वराळे, सोमाटणे,इंदोरी, काले, शिळाटणे येथे प्रत्येकी सापडले. असे एकूण 27 रुग्ण सापडले.

27,292 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,089, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,678 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,407 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 15,174 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,157 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.63 टक्के आहे तर मृत्यू दर 1.85 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 193 , लोणावळा नगरपरिषदमध्ये 119, वडगाव नगरपंचायतमध्ये 21 व ग्रामीण भागात 181 असे एकूण 514 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.