Maval Corona Update : तालुक्यात आज 53 नवे कोरोना रुग्ण तर 47 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रुग्ण संख्येत वाढ झाली असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. मावळ तालुक्यात रविवारी (दि.13) 53 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन, आतापर्यंत 450 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 651 आहे.

शहरी भागात 18 तर ग्रामीण भागात 35 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 12 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 02 रुग्ण सापडले, वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 04 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22,826 झाली आहे. तर दिवसभरात 47 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात सोमाटणे व इंदोरी प्रत्येकी 5, ताजे 4, धामणे, कामशेत व सुदुंबरे प्रत्येकी 3, शिरगाव, माळवाडी व नवलाख उंब्रे प्रत्येकी 2 , बोरज, कान्हे, चांदखेड, बेबडओहळ, वाकसई व नानोली तर्फे चाकण प्रत्येकी 1 असे एकूण 35 रुग्ण सापडले.

21,725 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 450 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,317 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3,892 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1177 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12,386 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,440 रुग्ण आढळून आले आहेत. 4 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.18 टक्के आहे तर मृत्यू दर 1.97 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 145 लोणावळा नगरपरिषदमध्ये 37 वडगाव नगरपंचायत मध्ये 28 व ग्रामीण भागात 441 असे एकूण 651 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.