Maval : दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी आमदार शेळके यांच्याकडून मोफत वाहतुक सेवा

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा क्षेत्रातील तेरा परीक्षा केंद्रावर (Maval)यंदा 6 हजार 668 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे आवश्यक असते.
यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने मावळ विधानसभेतील (Maval)विशेषतः ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घर ते परीक्षा केंद्र अशी मोफत वाहतुक सेवा सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सलग सातवे वर्ष असून दरवर्षी या उपक्रमाचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.
आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने मावळ विधानसभेतील विशेषतः ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घर ते परीक्षा केंद्र अशी मोफत वाहतुक सेवा सुरु करण्यात आली आहे.या उपक्रमाचे सलग सातवे वर्ष असून दरवर्षी या उपक्रमाचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा शुक्रवार (दि 1)पासून सुरु झाली.मावळ विधानसभेतील तेरा परीक्षा केंद्रावर यंदा 6668 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे आवश्यक असते.परंतु इतर वाहतूक व्यवस्था वेळेवर उपलब्ध होण्याची शाश्वती नसते.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते ही समस्या ओळखून मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून सन 2016-17 पासून तालुक्यातील विविध भागातून घर ते परीक्षा केंद्र अशी मोफत वाहतुक सेवा सुरु करण्यात आली आहे.

● ही आहेत परीक्षा केंद्रे :-
तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परुळेकर केंद्रावर 1062 विद्यार्थी, परांजपे विद्या मंदिर 792, श्री शिवाजी विद्यालय देहूरोड 289 विद्यार्थी, सेंट ज्युड हायस्कूल 469,न्यु इंग्लिश स्कूल वडगाव 776,पवना विद्यामंदिर 441,पंडित नेहरु माध्य.विद्यालय कामशेत 604,न्यु इंग्लिश स्कूल चांदखेड 328, डॉ.बी.एन.पुरंदरे विद्यालय लोणावळा 352, ॲड.बापुसाहेब भोंडे विद्यालय लोणावळा 684, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल 366, संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र 75 अशा एकूण तेरा परीक्षा केंद्रावर 6668 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
आंदर मावळ,पवन मावळ, नाणे मावळ भागातील कामशेत, माळेगाव, तुंग,कुसवली,वहाणगाव,वारु, वडेश्वर,दिवड,पाथरगाव,सांगिसे, टाकवे,पवनानगर,कान्हे, कार्ला, शिवणे,बौर,ओझर्डे, पाचाणे,कुरवंडे आदी गावांमधून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्या-येण्यासाठी सुमारे दिडशे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
भवितव्याच्या दृष्टीने शालेय जीवनातील महत्त्वपूर्ण असलेली दहावीची परीक्षा विद्यार्थी देत आहेत.विद्यार्थी इतर वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहिल्यास परीक्षेला उशीर होऊन शैक्षणिक नुकसान होण्याची  संभावना असते. घरापासुन परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचले पाहिजे.
तसेच परीक्षेच्या काळात मुलांना अभ्यासासाठी अधिक वेळ देखील मिळाला पाहिजे.अशा तणावमुक्त अभ्यासासाठी व मुलांच्या उज्वल यशासाठी आमदार सुनिल शेळके यांनी मोलाचा हातभार लावल्याबद्दल पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.