Maval : दोन भावाकडून ग्रामपंचायत शिपायाला मारहाण

एमपीसी न्यूज – पाण्याचे कनेक्शन आडवे का घेतले? अशी विचारणा (Maval) करणाऱ्या ग्रामपंचायत शिपायाला दोन भावांनी मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी (दि.13) मावळातील आढे या गावात घडला आहे.

याप्रकरणी ज्ञानेश्वर किसन तिडके( वय 40) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकर तुकाराम सुतार व गणेश तुकाराम सुतार या दोन भावा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्यांच्या घरासमोर पाण्याचे कनेक्शन हे आडवे घेतले आहे. याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली याचा राग घेऊन शंकर याने फिर्यादीला दमदाटी करत कानाखाली मारली. तसेच तू कोण आहे विचारणारा असे म्हणत ते दिसला तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली.

ICC News : भारताचा विंडीजवर मोठा विजय

यावेळी (Maval) आरोपीचा भाऊ गणेश हा बाहेर आला व त्यानेही प्लास्टिक पाईपने फिर्यादीलास मारहाण केली. फिर्यादी हे आढे ग्रामपंचायत येथील शिपाई आहेत हे माहिती असून देखील दोघा भावांनी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केली. यावरून शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.