Maval News : सुदुंबरे येथे चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चार लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी साडेपाच ते शनिवारी (दि. 30) पहाटे पाच वाजताच्या कालावधीत मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे घडली.

राजेंद्र मुरलीधर होनावळे (वय 44, रा. सुदुंबरे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी साडेपाच ते शनिवारी (दि. 30) पहाटे पाच वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरटयांनी घरचे कुलूप तोडून, कडीकोयंडा कटावणीसारख्या हत्याराने कापून आत प्रवेश केला. लाकडी कपाटाच्या पोटमाळ्यावर ठेवलेले 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन लाख 10 हजार रोख रक्कम असा एकूण चार लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.