T20 WC: IND vs NZ  : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय 

एमपीसी न्यूज – भारताचा आज न्युझीलंड सोबत सामना होत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कोणताही धोका न पत्करता टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी आजचा विजय आवश्यक आहे. 

भारतीय आज महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून, इशान किशनला संघात स्थान देण्यात आले आहे. भुवनेश्वरला विश्रांती देत शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.
असा आहे भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड 
 केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, डेव्हन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, (यष्टीरक्षक), मिचेल सेंटनर, ईश सोधी, टिम साउदी, ऑडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.