Maval News : इनरव्हील क्लबच्या वतीने वरसुबाई विद्यालयात सायकलींचे वाटप                                                                                    

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील अतिशय डोंगरी दुर्गम आणि आदिवासी भागातील माळेगाव येथील वरसुबाई माध्यमिक विद्यालयातील 27 विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब निगडी प्राईड आणि इनरव्हील क्लब बाणेर हिल यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकली देण्यात आल्या. 

 

विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नांतून या सायकल मिळाल्याने शाळेपासून 10 ते 12 की.मी अंतर पायपीट करणा-या विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावारा उरला नाही. विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एसटीची गैरसोय, इतर साधनांचा अभाव त्यामुळे नेहमीच पायी प्रवास करावा लागत असे हे शल्य मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांना रोजच अस्वस्थ करीत होते. त्यांनी यावर मार्ग काढण्यासाठी काही सामाजिक संस्थेशी संपर्क केला असताना इनरव्हील क्लबच्या महिला पदाधिकारी पुढे आल्या आणि इनरव्हील क्लब  निगडी प्राईड आणि बाणेर हिल यांनी मिळून विद्यार्थ्यांना या सायकल अध्यक्षा निर्मल कौर आणि बबीता कौशीक यांचे हस्ते वितरीत केल्या.

 

यावेळी इनरव्हील कलबच्या अध्यक्षा बबीता कौशीक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सायकल हे गतीचे प्रतीक असून ज्या विद्यार्थ्यांना सायकल मिळाली आहे. त्यांनीही शिक्षणासाठी गतीशील होण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. शिक्षण घेऊन जीवनात खूप मोठे व्हा यशस्वी व्हा आणि समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून गरजूंना मदत करता येईल येवढे मोठे व्हावे अशी आशा व्यक्त केली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू बेदमुथ्था यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी क्लबच्या खजिनदार पौर्णिमा गजूल, सदस्या हीना मनीयार, योगीता बडवे, पद्मजा गणपत्ये, रो.गूरूदिपसींग कौर, संस्थेचे सचिव पोपट बाफना, पोलीस पाटील जालींदर मेटल, ग्राम पंचायत  सदस्य कुंदा बोराडे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ दगडे, भाऊसाहेब बोराडे, गबळू लांघी आदी मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

सह शिक्षक संतोष बारसकर, तुषार पवार, सुनील गायकवाड, अशोक सुपे, बाळू गायकवाड, रघूनाथ सातकर यांनी कार्यक्रम नियोजनासाठी परीश्रम घेतले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन नामदेव गाभणे यांनी केले. आभार राजेंद्र भांड यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.