Sangvi News : पिंपळे गुरव येथे दारूच्या नशेत टोळक्याकडून पाच वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथे एका टोळक्याने पाच वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार बुधवारी (दि. 27) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली.

सूर्यभान दगडू चोथवे (वय 40, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव, सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टोळक्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास एका टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. वाहनांच्या काचा फुटल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. टोळक्याच्या हातात धारदार शस्त्र असून हा प्रकार टोळक्याने दारूच्या नशेत केल्याचं म्हटलं जातं आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.