Maval News : वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या पूजा वहिले

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी आज झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका पूजा विशाल वहिले यांनी भाजपचे उमेदवार किरण रघुनाथ म्हाळसकर यांचा दोन मतांनी पराभव करुन विजयी झाल्या. वहिले यांना दहा मते मिळाली तर म्हाळसकर यांना आठ मते मिळाली.

यापुर्वीच्या उपनगराध्यक्षा प्रमिला बाफना यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या पदासाठी आज शुक्रवार (दि 9) पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेऊन उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली.

या वेळी उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा विशाल वहिले व भाजपच्या वतीने किरण म्हाळसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मतदान घेण्यात आले पूजा वहिले यांना दहा मते मिळाली तर किरण म्हाळसकर यांना आठ मते मिळाल्याने पूजा वहिले 2 मतांनी विजयी झाल्याचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी जाहीर केले.

याप्रसंगी मावळत्या उपनगराध्यक्षा प्रमिला बाफना, नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, पूजा वहिले, चंद्रजित वाघमारे, माया चव्हाण, शारदा ढोरे, पूनम जाधव, सायली म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, दिनेश ढोरे, प्रवीण चव्हाण, दीपाली मोरे, सुनीता भिलारे, दशरथ केंगले आदींनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. निवडणुकीचे वार्तांकन मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी केले.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सभापती बाबुराव वायकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, काँगेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, नगरसेवक सुनील ढोरे, माजी सरपंच पोपट वहिले, किसन वहिले, राजेश बाफना, अतुल राऊत, आफताब सय्यद, मंगेश खैरे, शैलेश वहिले, सोमनाथ धोंगडे, गणेश ढोरे, शरद ढोरे, भाऊ ढोरे व बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वहिले यांच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. सत्काराप्रसंगी उपनगराध्यक्ष पूजा वहिले म्हणाल्या नगरपंचायत हद्दीत रस्ते, वीज, अंतर्गत गटारी, आरोग्य, पथदिवे तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी अग्रेसर राहणार तसेच नगरपंचायत व नागरिक यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही वहिले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.