Maval : दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पुसाणे गावात (Maval)ओढ्याच्या कडेला सुरु असलेल्या दारू भट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एक लाख 63 हजारांचा ऐवज नष्ट केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 9) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस अंमलदार शुभम राजगुरे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : हातचलाखीने सोने चोरून रुमालात बांधून दिली माती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने(Maval) पुसाणे गावात ओढ्याच्या कडेला बेकायदेशीरपणे दारूभट्टी लावली. याबाबत माहिती मिळाली असता शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यात गुळ मिश्रित कच्चे रसायन आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 63 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.