Chakan : हातचलाखीने सोने चोरून रुमालात बांधून दिली माती

एमपीसी न्यूज – दोघांनी एका महिलेला (Chakan) तिच्याकडील दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले. त्यांनतर हातचलाखी करून रुमालातील दागिने काढून घेतले आणि त्यात माती टाकून रुमाल महिलेला देऊन दोघेजण पळून गेले. ही घटना 24 सप्टेंबर रोजी माणिक चौक चाकण येथे घडली.

याप्रकरणी महिलेने सोमवारी (दि. 9) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 24 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास चाकण मधील माणिक चौकातून जात होत्या. त्यावेळी त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी थांबवले. त्यातील एकाने फिर्यादीकडे 500 रुपयांची मदत मागितली.

NCP : सरकारमध्ये सहभागी होऊन 100 दिवस पूर्ण, अजितदादांचे राज्यातील जनतेला पत्र

त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने फिर्यादिसोबत बोलून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडील दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले. आरोपींनी रुमाल हातात घेऊन हातचलाखी करून त्यातील दागिने काढून घेतले आणि रुमाल परत महिलेकडे दिला.

त्यानंतर आरोपी तिथून पळून गेले. फिर्यादी महिलेने काही अंतर पुढे गेल्यानंतर रुमाल उघडून पाहिला असता त्यात दागिने नसून माती आढळली. (Chakan) चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.