Pune : पुण्यातील फेक ऑनलाईन कंपनीकडून राज्याभरातील गुंतवणूकदारांची 100 कोटी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फेक ऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून तब्बल 100 कोटी रुपयांची (Pune) फसवणूक करण्यात आली आहे. जादा परताव्याच्या आमिषानं राज्याभरातील गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र आता घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. ईडीकडून या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NCP : सरकारमध्ये सहभागी होऊन 100 दिवस पूर्ण, अजितदादांचे राज्यातील जनतेला पत्र

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, 2020 मध्ये पुण्यातील आंबेगाव परिसरात या कंपनीची (Pune) स्थापना करण्यात आली होती. राज्यभरातील गुंतवणूकदारांना जादा पैशांचं आमिष दाखवून 2020 पासून त्यांच्याकडून पैसे घेतले जात होते. वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा करण्यात येत होती. जमा झालेले पैसे हवालामार्फत परदेशात ट्रान्सफर करण्यात आले असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणात ईडीकडून पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुख्य आरोपी आणि कंपनीचा मालक दुबईला पळून गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ईडीकडून या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू (Pune)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.