Pune News : एमसीएची निवडणूक प्रक्रियाच बोगस, माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांचा आरोप

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक 8 जानेवारीला होणार आहे. मात्र, ही निवडणूक प्रक्रियाच सुप्रीम कोर्टाच्या शिफारशींनुसार (Pune News) नाही आणि घटनेनुसारही नाही. ही पूर्ण प्रक्रियाच बोगस असल्याचा आरोप माजी रणजी क्रिकेटपटू अनिल वाल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

पत्रकार परिषदेला माधव रानडे, ॲड. कमल सावंत उपस्थित होते.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची 2022-25 ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी 27 डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर तीन जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार असून, त्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जे. एस. सहारिया यांनी हा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, गुरुवारी पत्रकार परिषदेत वाल्हेकर यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

वाल्हेकर म्हणाले, ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची 2022 ते 2025 या कालावधीसाठी ची निवडणूक प्रक्रिया ही सुप्रीम कोर्टाच्या शिफारशींना धरून नाही;(Pune News) तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची घटना ही फक्त धर्मादाय आयुक्तांकडे सादर केल्याचा दावा केला आहे. त्या घटनेला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही ही निवडणूक होत आहे. घटना मंजूर नसताना ही निवडणूक होतेच कशी?’

Pune News : हडपसर येथे रविवारी भरणार हिंदु राष्ट्र जागृती सभा – पराग गोखले

वाल्हेकर यांनी आणखी दुसरा एक मुद्दा उपस्थित केला. या निवडणुकीत सुरुवातीला 16 कौन्सिलरची अर्थात सर्वोच्च समितीच्या सदस्यांसाठी ची निवडणूक होईल. सोळा सदस्यांमधून पाच पदासाठी निवडणूक लढवता येईल. यात त्रुटी दाखविताना वाल्हेकर म्हणाले, ‘पहिला मुद्दा असा की आधी सर्वोच्च समिती सदस्यांची निवडून कशी होऊ शकते.(Pune News) आधी अध्यक्ष-उपाध्यक्ष अशी पदाधिकाऱ्यांची निवडणूक होणे अपेक्षित आहे. जर आधी सर्वोच्च समिती सदस्यांची निवडणूक होत असले, तर हेच सभासद पदाधिकारी म्हणून निवडणूक लढवू शकणार आहेत. जे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार नाही.’

आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मतदानाच्या अधिकाराबाबतही वाल्हेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ‘या घटनेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मतदानाचा अधिकार नाही. एमसीएने आंतरराष्ट्रीय खेळाडूंची निवडणूक दाखवून खेळाडू प्रतिनिधींचा अधिकार काढून घेतला आहे. याबाबत घटनेमध्ये बदल करताना निवडणूक प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मतदान अधिकार देताना त्यांच्यामधील निवडणूक रद्द करताना निवडणूक अधिकारी यांनी ही घटना अयोग्य असल्याचे सिद्ध केले आहे.’

अॅड. नीला गोखले यांनी सादर केलेला इ-मेल वर निवडणूक जाहीर करणे योग्य नव्हते. कारण सुप्रीम कोर्टाने किंवा समिती एमसीएच्या घटनेला मान्यता दिल्या बाबतचा कोणताही उल्लेख इ-मेल मध्ये नाही.

जालना क्रिकेट असोसिएशनला निवडणुकीचा अधिकार देताना जुने सभासद ‘डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन जालना’ यांचा अधिकार काढून घेतला. वास्तविक त्यांनी सर्व पुरावे देऊन सुद्धा जुन्या संघटनेवर अन्याय केला आहे, असा आरोप अनिल वाल्हेकर यांनी केला.

ते पुढे म्हणाले, ही निवडणूक प्रक्रियाच बेकायदेशीर आहे. निवडणूक होण्याला आमचा विरोध नाही. मात्र, त्यात पारदर्शकता हवी आणि घटनेनुसार, (Pune News) सुप्रीम कोर्टाच्या शिफारशींनुसार ती व्हावी.,तरी योग्य विचार करून निवडणूक अधिकारी यांनी निर्णय करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.