Sangvi Police : पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसालाच नोकरी घालवण्याची धमकी

एमपीसी न्यूज : तक्रार घेऊ नका नाही तर तुमची नोकरी घालवेन अशा भाषेत पोलीस ठाण्यात जाऊन धमकी देणाऱ्या तरुणावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(Sangvi Police) हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.22) मध्यरात्री एक वाजता घडला आहे.

अनिकेत मनोज चव्हाण (वय 28, रा. नवी सांगवी), अक्षय संभाजी शिंदे (वय 23, रा. पिंपळे गुरव), ओंकार सुधाकर घाडगे (रा. नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार विजय शेलार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PAN update : पॅन क्रमांक अपडेट करण्याच्या नादात गमावले 58 हजार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहायक फौजदार शेलार हे गुरुवारी मध्यरात्री सांगवी पोलीस ठाण्यात हजर असताना आकाश सचिन भापकर (वय 24, रा. नवी सांगवी) हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी सचिन यांचे मित्र आरोपी देखील पोलीस ठाण्यात आले.(Sangvi Police) आरोपींनी सचिन याची तक्रार घ्यायची नाही, असे म्हणत अरेरावी करून फिर्यादीस तुमची नोकरी घालवतो अशी धमकी दिली. फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.