Shivsena Dasara melava : शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच आवाज घुमणार, हायकोर्टाकडून दसरा मेळाव्याला परवानगी

एमपीसी न्यूज : यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवसेनेची पक्ष म्हणून परवानगी मागत दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली.(Shivsena Dasara melava) याआधी मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाला दणका देत आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली. त्यामुळे शिवसेनेला परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

शिवाजी पार्कवर  दसरा मेळावा कोण घेणार? यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान शिवसेना, मुंबई महापालिका आणि शिंदे गटाकडून आपापली बाजू मांडण्यात आली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली.

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवत मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली.(Shivsena dasara melava) त्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली होती.

PAN update : पॅन क्रमांक अपडेट करण्याच्या नादात गमावले 58 हजार

शिवाजी पार्कच्या संदर्भातील याचिकेवर याचिकाकर्ते शिवसेनेसाठी कायदेतज्ञ आस्पी चिनॉय बाजू मांडली. तर प्रतिवादी मुंबई महापालिकेसाठी कायदेतज्ञ मिलिंद साठ्ये बाजू मांडली.(Shivsena dasara melava) तर मध्यस्थ म्हणून आलेल्या सदा सरवणकरांसाठी कायदेतज्ञ जनक द्वाकरादास यांनी बाजू मांडली. तिन्ही बाजूंकडनं न्यायालयात वकिलांची तगडी फौज तैनात करण्यात आली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.