Pune : कर्वे रोडवर जून २०२० पर्यंत मेट्रो धावेल

मेट्रो अधिकाऱ्यांनी महापौरांना दिला विश्वास

एमपीसी न्यूज – पुणे शहरात वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी मेट्रो आवश्यक असून जून 2020 पर्यंत कर्वे रोडवर मेट्रो धावणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे व्यक्त केला.

मेट्रोचे काम जोरात सुरू असून, जून, 2020 अखेर कर्वे रस्त्यावरील आयडीएल कॉलनी ते गरवारे कॉलेज या 5 कि़. मी़. अंतरावरील मेट्रोतून पुणेकरांना प्रवास करता येणार आहे. मेट्रोचे अन्य मार्गही प्रगतीपथावर आहे. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेत जैन इरिगेशन ऐवजी दुसऱ्या कंपनीची नियुक्ती करावी, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

अहमदाबादच्या धरतीवर पुण्यातील महापालिकेच्या मालकीचे आणि सर्वसामान्यांना परवडेल, अशा वैद्यकीय महाविद्यालयात जून, २०२१ पर्यंत प्रवेश दिले जातील़. याकरिता आवश्यक सर्व परवानग्या व विश्वस्त नियुक्तीसाठी राज्य शासनाशी समन्वय साधून, याबाबत खुलासा दोन दिवसात प्रशासनाने करावा़, अशी सूचना महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे.

आरटीओ ते येरवडा हा दुसरा मार्ग डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार आहे़. तर, स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग इलिवेटेड होऊ शकत नसल्याने येथे भूयारी मार्ग करण्यासाठीचा डीपीआर तयार करण्यासाठी, वनाज ते शिवसृष्टी मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी संबंधितांना ३२ लाख रूपये देण्यास मंजुरी या बैठकीत देण्यात आली़ आहे. याचबरोबर शहरातील सुमारे ८२ कि़मी मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.