Talegaon Dabhade News : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ

एमपीसी न्यूज : मागील वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाच्या प्रादुर्भावाने प्रभावित झाले होते. भारतातील निर्मित दोन कंपन्यांमार्फत कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू करण्यात आले असून याच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षाच्या वरील विशिष्ट आजाराने ग्रासलेले नागरिक यांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कोविड लसीकरण केंद्रचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, डॉ.सत्यजित वाढोकर, डॉ.वर्षा वाढोकर, उपसरपंच विशाल मुऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य नितीन मुऱ्हे, धनश्री मुऱ्हे, शैलेश मुऱ्हे, सचिन मुऱ्हे व इतर जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोनाची ही लस प्रभावी असून लस घेतल्यानंतर नागरिकांना लसीचा दुसरा डोस 28 दिवसांच्या अंतराने घ्यायचा आहे. यासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची असून लसीकरणाच्या वेळी दिलेल्या वेळेत सोशल डिस्टंसिंगचे पालन करत लस घ्यायची आहे. यासाठी पवना हॉस्पिटलमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

 एक मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोविडची लस मिळू शकणार आहे. मावळ तालुक्यातील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. कोरोना विरुद्धची लढाई अजून संपलेली नसुन नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे शेळके म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.