Sangvi News : एमएनजीएल पाईपलाईन आग प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एमएनजीएलच्या पाईपलाईनचे काम करताना निष्काळजीपणामुळे आग लागली. या आगीत चार वाहने जळून खाक झाली. याप्रकरणी संबंधिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 मे रोजी जुनी सांगवी येथे घडली.

दत्तात्रय गुंडू (रा. अभिजित पार्क, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ज्ञानेश्वर किसन हुलावळे (वय 49 रा. रामनगर, पिंपळे गुरव) यांनी मंगळवारी (दि. 18) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथील शितोळे शाळेसमोर एमएनजीएलची पाईपलाईन लिकेज झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी आरोपी दत्तात्रय गुंडू यांनी काम करताना कोणतीही सुरक्षेबाबत उपाययोजना केली नाही.

यामुळे त्या ठिकाणाहून ठिणगी उडून आग लागली. या आगीत फिर्यादी हुलावळे यांची कार (एम एच 14 / ई पी 8856) व इतर तीन कार पूर्णपणे जळून खाक झाल्या. तसेच एका कारचे किरकोळ नुकसान झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.