Raj Thackeray corona negative :मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या हेल्थ अपडेटविषयी माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंचे कोरोना  चाचणी रिपोर्ट आले आहेत. या रिपोर्टनुसार, राज ठाकरे कोरोनामुक्त झाले आहेत. राज ठाकरेंची 29 ऑक्टोबरला चाचणी करण्यात आली. या चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर ते कोरोनामुक्त झाल्याचं समजलं. तसंच आनंदाची बातमी म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री कुंदाताई, बहिण देखील कोरोना मुक्त झाल्या आहेत.

राज ठाकरे यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील परकार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. कृष्णकुंजवर कोरोनाचा शिरकाव 23 ऑक्टोबर रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी कोरोनाने शिरकाव केला. राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह  आला होता.

त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या आई आणि बहिणींनाही कोरोनाची लागण झाली होती. सर्वांवर लिलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्यात आले  राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली होती. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती.

त्यात राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई आणि मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आले होते. मार्च महिन्यात राज ठाकरे यांच्या आई आणि बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांनी कोरोनाची लस घेतली होती. शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा तिघांची कोरोना प्रतिबंधक चाचणी केली. त्याचा रिपोर्ट संध्याकाळी आला. या रिपोर्टमध्ये राज ठाकरेंनी कोरोनावर मात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.