Bhosari Crime News : जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न 

एमपीसी न्यूज – एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार करत एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. नुर मोहल्ला गल्ली चौक, भोसरी येथे गुरुवारी (दि.28) रात्री साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुसा उर्फ मुसीफ वजीर थोरपे (रा. नुर मोहल्ला गल्ली चौक, भोसरी) आणि विनय (पूर्ण नाव माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अमन मुबारक सय्यद (वय 18, रा. नुर मोहल्ला गल्ली चौक, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमन हे गुरुवारी (दि.28) रात्री साडे सातच्या सुमारास एका फटाक्यांच्या दुकानाजवळ उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांच्या सोबत एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार करत गंभीर दुखापत केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.