Pune News : सराईत मोबाईल चोरटा अटकेत, 38 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज : एका सराईत मोबाईल चोरट्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून चोरलेले 38 मोबाईल जप्त केले आहेत. आरोपी हा मूळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी असून त्याच्या टोळीने महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. 

नागेश आप्पाना (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे. आरोपी आपल्या टोळीसह हैदराबादहून पुण्यात कारने येत असत. पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत आरोपी प्रवाशांचे मोाबाइल गायब करत होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपींचा हा खेळ सुरू होता.

दरम्यान, पीएमपीएल बसमध्ये चोरी करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकची एक टोळी आल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अधारे अमली पदार्थविरोधी पथकाने स्वारगेट परिसरात उभ्या असलेल्या एका इरटिगा कारची झडती घेतली. यावेळी गाडीत एकूण 38 महागडे  फोन आढळले आहेत. पोलिसांनी सर्व मोबाइल आणि कार जप्त केली आहे. एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.