Talegaon Dabhade News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पार्वतीबाई यशवंतराव भेगडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – शेतकरी कुटुंबातील व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पार्वतीबाई यशवंतराव भेगडे (वय 92) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. 

माजी नगरसेवक अशोक भेगडे यांच्या त्या मातोश्री होत्या, तर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या चुलती व तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिकेत भेगडे, उद्योजक अजिंक्य भेगडे यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.