Moshi : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठे उद्योग राज्याबाहेर गेले – उद्योगमंत्री उदय सामंत

एमपीसी न्यूज : आज मोशी येथे झालेल्या पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या (Moshi) उद्योजक मेळाव्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघडीबाबत बोलताना म्हंटले, की दीर्घकाळ कॅबिनेट सब कमिटी मीटिंग व इतर कमिटी मिटींग न झाल्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यबाहेर उद्योग गेले आहेत. 

सामंत म्हणाले की, “महाविकास आघाडीचे नेते आरोप करत आहेत, की आमच्या काळात विविध मोठे उद्योग राज्यबाहेर गेले आहेत. आम्ही या संबंधात श्वेतपत्रिका काढणार आहोत. त्यांच्या काळात 18 महिने कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग झालीच नाही. तसेच 8 महिने हाय पॉवर कमिटी मीटिंग झाल्या नाहीत. त्यामुळे मोठे उद्योग जसे वेदांत फॉक्सकॉन राज्यबाहेर गेले आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “सिनर्मास ही इंडोनेशिया देशातील मूळची कंपनी आहे. तिला रायगडमध्ये प्लांट उभारायचा होता. त्यांना जमीन व पाण्यासंदर्भात सवलत (कन्सेशन) हव्या होत्या. पण, मुख्यमंत्र्यांनी 18 महिने कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग घेतली नाही. त्यामुळे ते त्यांचा प्लांट राज्यबाहेर नेणार होते. पण, आम्ही सत्तेत आल्यावर हे कळताच ती मिटींग घेतली व 25, 368 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली.”

Moshi News : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्य केल्या पिंपरी चिंचवड उद्योजकांच्या विविध मागण्या

सामंत हे या उद्योजक मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे (Moshi) म्हणून उपस्थित होते. तत्पूर्वी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व भोसरी विधान सभेचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्राच्या व येथील लघु उद्योजकांच्या विविध समस्या मांडल्या व व त्या दूर करण्याचे आवाहन सामंत यांना केले.

कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, एमआयडीसी व महावितरणचे अधिकारी, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, संस्थापक अध्यक्ष तात्या सपकाळ, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, जयंत कड, अजय भोसले, संघटनेचे पदाधिकारी व लघु उद्योजक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.