BNR-HDR-TOP-Mobile

Moshi : पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाची सोन्याची माळ हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक लाख 35 हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हिसकावली. ही घटना सोमवारी (दि. 9) सकाळी साडेसातच्या सुमारास मोशी प्राधिकरण येथे घडली.

शेवंताबाई गोरखनाथ मोरे (वय 80, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवंताबाई सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मोशी प्राधिकरण येथील ब्रिज सोसायटीच्या मागच्या बाजूला असलेल्या बाकांवर बसल्या होत्या. काही वेळाने त्या शेजारी चालत असताना मागून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळ्यांची एक लाख 35 हजार रुपये किमतीची सोन्याची माळ जबरदस्तीने चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3