Mumbai : शासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनात 50 ते 75 टक्के, तर लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात : अजित पवार

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्याच्या प्रादुर्भावामुळे राज्यात आरोग्य संकट निर्माण झाले आहे. तसेच राज्यातील ‘टाळाबंदी’मुळे आर्थिक उत्पन्नातही घट झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनात कपातीचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.

या वेतन कपातीनुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधिमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे.

तसेच ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के, तर ‘क’ वर्ग कर्मचाऱ्यांच्या वेतनात 25 टक्के कपात करण्यात येणार आहे. मात्र, ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.