Mumbai : अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी !

एमपीसी न्यूज- राज्यात भाजप सोबत सरकार स्थापन करून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले असून अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अजित पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून शरद पवार यांनी अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असून त्याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षामध्ये फूट पडली असल्याचे आशय व्यक्त करणारे व्हाट्स अँप स्टेटस ठेवले आहे.

आता शरद पवार व उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेणार असून यामध्ये शरद पवार काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.