Mumbai : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक

एमपीसी न्यूज- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी आरोप असलेले आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी आज पहाटे मुंबईतून अटक केली. पुणे सत्र न्यायालयाने यापूर्वी झालेल्या सुनावणीत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पुणे सत्र न्यायालयाने 31 जानेवारीला झालेल्या सुनावणीत तेलतुंबडे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. देशात अराजकता माजवण्यासाठी तुम्ही कोरेगाव भीमा दंगल घडवून आणा, असा ठराव भारतीय कम्यूनिस्ट पक्षाने (माओवादी) केला, असा दावा न्यायालयामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.