सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pimpri News : दृष्टिहीन भगिनींच्या राख्यांनी भारावले महापालिका आयुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील दृष्टिहीन बांधवांच्या रोजगार,शिक्षण आणि प्रशिक्षणाबाबत महापालिका प्रशासन पुढाकार घेईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.रक्षाबंधना निमित दृष्टिहीन बांधवांनी बनविलेल्या (आस्था) राख्या पिंपरी-चिंचवड आयुक्त पाटील यांच्या हातावर बांधण्यात आल्या.शहरातील दृष्टिहीन भगिनींच्या राख्यांनी महापालिका आयुक्त भारावले.

चिंचवड येथील आस्था हँडीक्राफ्ट्समधील दृष्टिहीन भागिनी व लायन्स क्लबच्या मान्यवरांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीत आयुक्तांची भेट घेत रक्षाबंधन साजरे केले.इतनी शक्ती हमे देना दाता या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. आयुक्तांच्या हातावर प्रेमाचा रेशिम धागा बांधत त्यांचे औक्षण करण्यात आले.दृष्टिहीन भागिनींना आयुक्तांनी पेढे भरवत त्यांच्या कार्याची माहिती घेतली.पुढील काळात प्रशासन विविध रोजगाराच्या संधी देईल, अशी भेट त्यांनी दृष्टिहीन बंधू-भगिनींना दिली.

याप्रसंगी आस्था हँडी क्राफ्ट्सचे अध्यक्ष पराग कुंकलोळ, लायन्स क्लब आकुर्डीचे अध्यक्ष अनिल भांगडीया, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, प्रज्ञा खानोलकर, निकिता कदम, प्रा. सविता नाणेकर, दिपा मुरकुटे, रोहिनी वारे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोखंडे, बालाजी सोनकांबळे आदी उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, महापालिका प्रशासन व समाजातील नागरिकांनी नेत्रदानाबाबत सजगतेने पाहिले पाहिजे. नेत्रदान जनजागृती प्रक्रिया जन सामान्यांना समजेल अशा स्वरुपात पुढे यायला हवी.  शहरात नेत्रदान जनजागृती साठी विशेष मोहीम उभारण्याची गरज आहे. नेत्रदानाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी सामाजिक संस्था व नागरिकांनी एकत्र कार्य व जनजागृती करावी.

spot_img
Latest news
Related news