गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Navratri : पिंपरीमध्ये पाच दिवसीय दुर्गा व काली पूजेचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपरीत (Pimpri) गितांजली संघो यांच्या वतीने 1 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत दुर्गा पुजा व काली पूजा 2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दुर्गा व काली पूजेचे चौथे वर्ष असून हा कार्यक्रम संभाजीनगरच्या रोटरी कम्युनिटी सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.

हे कार्यक्रम सायंकाळी सातनंतर सुरु होणार आहेत. यामध्ये 1 ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा, भोग-प्रसाद वाटप, कार्यक्रमाचे उद्घाटन व सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी पूजा भोग झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात सप्तमी निमित्त सायान चौधरी त्यांचे गायन सादर करणार आहेत. 3 ऑक्टोबर रोजी अदिती मुंशी या महा अष्टमी निमित्त गायन सादर करणार आहेत. 4 ऑक्टोबर रोजी म्युझिकल नाईटमध्ये उपस्थितांना पूजेनंतर सौम्या चक्रवर्ती व श्रेयाश्री चक्रवर्ती यांच्या गायनाचा आस्वाद घेता येणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी पूजा, आरती, भोग व सिंदूर उत्सव, दुर्गा देवी मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.

या नवरात्र उत्सवाबरोबरच 9 ऑक्टोबर रोजी पौर्णिमेला लक्ष्मीपूजन व 24 ऑक्टोबर रोजी काली पूजन केले जाणार आहे. तरी इच्छुक भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष अरींद्रम घोराई 8975270200, सचिव सम्राट सेनगुप्ता 7030092233 व आशीष चटर्जी 8087884416 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Latest news
Related news