NCP : आमदार अण्णा बनसोडे म्हणतात, अजितदादा आज उपमुख्यमंत्री पण ….

एमपीसी न्यूज – सध्या अजितदादा उपमुख्यमंत्री (NCP ) असले, तरी ते नक्कीच आगामी काळात मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठीच आम्ही सत्तेत सहभागी झालो असल्याचे पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

मी अजितदादांचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्यांच्यासोबत मी 25 वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर आपला पूर्णपणे विश्वास आहे. मुख्य म्हणजे अजितदादांसारख्या कार्यक्षम नेत्याने मुख्यमंत्री व्हावे, ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे. आम्हा सर्वांचीही तीच इच्छा आहे. त्यामुळेच सत्तेत सहभागी होण्याची भूमिका आम्ही दादा समर्थक आमदारांनी घेतली आहे.

Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये शेकडो गुन्हेगारांची झाडाझडती

सत्तेत सहभागी झाल्याने राज्याच्या, शहराच्या विकासाला चालना मिळू शकते. आज युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांपुढे मोठे प्रश्न आहेत. हे प्रश्न सुटले पाहिजेत. लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्याकरिता सत्तेत जाण्याचा निर्णय दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीला अद्याप एक ते दीड वर्षे बाकी आहे. उर्वरित (NCP ) कामे पूर्ण केली, तर निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होऊ शकेल. राष्ट्रवादीचे अधिकाधिक आमदार निवडून येतील. आमचे अधिक आमदार निवडून आले, तर स्वाभाविकपणे आम्हाला मुख्यमंत्रिपदावर दावा करता येईल व अजितदादा मुख्यमंत्री होतील, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.