Pimpri : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करा

कामगार कर्मचारी संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – राज्यातील महानगरपालिकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. याबाबत महापालिकेने शासन मान्यतेची पुन्हा आवश्यकता असणार नाही, अशा रितीने सहाव्या वेतन आयोगातील दि. १० ऑगस्ट २००९ च्या शासन निर्णयानुसार आदेश निर्गत करणे आवश्यक होते. सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित केलेल्या वेतन श्रेणी व राज्य शासनांकडील संबंधित समकक्ष पदांना लागू करण्यात आलेल्या वेतन श्रेणींपेक्षा कोणत्याही परिस्थिती अधिक असणार नाहीत असे नमुद केले आहे.

राज्यातील महानगरपालिका कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने या अगोदरही निवेदने दिली आहे. तरी सातवा वेतन आयोग लागू करावा अन्यथा दि. ९ सप्टेंबरला राज्यातील सर्व महापालिका कर्मचारी संघटना त्या महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दि. १२ सप्टेंबरपासून सर्व महापालिका कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.