NEW CITY PRIDE RAHATNI : लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन (NEW CITY PRIDE RAHATNI) संचलित ‘न्यू सिटी प्राईड इंग्लिश माध्यम स्कूल’ रहाटणी येथील लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व प्रमुख पाहुणे माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

Tree Plantation: जे.आर.डी .टाटा यांच्या जयंतीनिमित्त भंडारा डोंगरावर वृक्षारोपण

प्रणिता जाधव, आरती जाधव, वैष्णवी गवळी, तारा विश्वकर्मा, अर्पिता तिवारी, यशश्री कुटे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुणे माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव यांनी या महान पुरुषांबद्दल माहिती सांगितली. तन्मय इंगळेआणि रिया परमार या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.