Pune : येत्या मंगळवारी वडगाव व धायरी परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज – वडगाव जलशुद्धीकरण केंद्र (Pune) येथील पाण्याच्या लाईनचे मंगळवारी (दि.18)  तातडीचे दुरुस्तीचे काम असल्याने मंगळवारी वडगाव व धायरी तसेच आसपासच्या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Maval : तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी 73 लाखांचा निधी मंजूर

हिंगणे, विश्रांती नगर, सनसिटी रोड, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव,धायरी, राजयोग सोसायटी, परांजपे परिसर येथे मंगळवारी (दि.18) रोजी पाणी पुरवठा बंद असणार आहे, (Pune) तर बुधवारी (दि.19) सकाळी कमी दाबाने पाणी येणार आहे. तरी नागरिकांची याची नोंद घेऊन योग्य ते पाण्याच्या साठवणूकीचे नियोजन करावे असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.