Nigadi : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून 25 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि 30) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास क्रांतीनगर आकुर्डी येथे घडली.

याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अल्ताफ शेख (वय 25, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ याने पीडित मुलीचा मागील दोन वर्षांपूर्वी पाठलाग केल्याने त्यांच्या घरच्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दोन कुटुंबांनी हे प्रकरण आपसात मिटवले होते. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीडित मुलगी भाजी आणण्यासाठी आकुर्डी मंडई येथे गेली.

भाजी खरेदी करून ती परत घरी येत असताना अल्ताफ याने तिला अडवले. तिचा पाठलाग करून विनयभंग केला. अल्ताफ याने मुलीचा हात पकडला, यामुळे मुलीने अल्ताफला लाथ मारली. यावरून अल्ताफ यानेही मुलीला मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल केला असून निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.