Nigdi : आयसीएआय तर्फे नवोदित सनदी लेखापालांचा निगडीत सत्कार

एमपीसी न्यूज – निगडी (Nigdi) येथील दि इंस्टीट्यूट ऑफ़ चॅर्टर्ड अकौंटंट्स ऑफ़ इंडिया (आयसीएआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने नवोदित सनदी लेखापालांचा (सीए) आयसीएआय भवन शनिवारी (दि.20) यावेळी 150 नवोदित सनदी लेखापालांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आयसीएआयच्या वेस्टर्न रिजनचे अध्यक्ष सीए मुर्तुजा काचवाला, उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, सचिव श्वेता जैन, खजिनदार पियुष चांडक, अतुल भेडा, पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष विजयकुमार बामणे, उपाध्यक्ष सचिन बंसल, सचिव पंकज पाटणी, सीए विद्यार्थी संघटना अध्यक्ष (विकासा) अध्यक्ष वैभव मोदी, खजिनदार सीए सारिका चोरडिया, माजी अध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारीया आदी उपस्थित होते.

Shri Krishna Janmotsav : श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्ट व गरवी गुजराथी समाजातर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

काचवाला म्हणाले कि, सध्या पर्यावरणासंबंधीत असलेला इएसजीचा कायदा हा केवळ काही ठरावीक कंपन्यांना लागू आहे. मात्र, कालांतराने सर्वच लहानमोठ्या कंपन्यांना लागू होणार आहे. ३पी म्हणजेच प्लानेट्, पीपल्स, प्रॉफिट यावर आधारीत संपूर्ण जगात कायदा लागू आहे. याच धर्तीवर देशात लागू होणार आहे. अतुल भेडा म्हणाले कि, ”आयुष्यात कधी मागच्या बेंचवर बसू. कारण, आपल्या मागून येवून समोरच्या रिकाम्या बेंचवर बसतील. असेच यशस्वी व्हायचे असेल, तऱ मागे बसू नका, असा सल्ला त्यांनी दिला.” यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (Nigdi) प्रतिमा भिसे तर आभार पंकज पाटणी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.