Nigdi : रांगेत येण्यास सांगितल्यावरून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज – ‘फ’ प्रभाग कार्यालयात आधार सेवा केंद्रातील कामासाठी रांगेत थांबलेल्या एका तरुणाने अचानक पुढे येऊन थांबलेल्या लोकांना रांगेत येण्यास सांगितले. त्यावरून तिघांनी मिळून तरुणाला लोखंडी वस्तूने बेदम मारहाण केली. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता घडली.

उत्कर्ष नागेश मोदी (वय 22, रा. रुपीनगर, तळवडे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 27) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर पवळे पुलाजवळ असलेल्या महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयात आधार सेवा केंद्रातील कामासाठी नागरिक रांगेत थांबले होते. त्यावेळी तीनजण अचानक सर्वात पुढे येऊन थांबले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्या तरुणांना रांगेत येण्यास सांगितले.

या रागातून तिघांनी मिळून फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी व लोखंडी वस्तूने बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्यात व कानावर दुखापत झाली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.