Nigdi Crime : ‘त्या’ ज्वेलर्सच्या दुकानातून 20 किलो चांदी चोरीला

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथे श्री नवकार ज्वेलर्स या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. त्यामध्ये चोरट्यांनी एकूण आठ लाख रुपयांचे 20 किलो चांदीचे दागिने चरून नेले आहेत. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेंद्र फुरटमल पुनमिया (वय 50, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी, विठ्ठलवाडी रोडवर फिर्यादी पुनमिया यांचे श्री नवकार ज्वेलर्स हे दुकान आहे. शनिवारी (दि. 19) रात्री सात वाजता त्यांनी त्यांचे दुकान कुलूप लाऊन बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील सात काउंटर उघडून त्यातून आठ लाख रुपयांचे 20 किलो चांदीचे दागिने चोरून नेले.

रविवारी (दि. 20) सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला आहे. आरोपीच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.