Nigdi: भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा अधिका-यांच्या कार्यालयाबाहेर बांधू

भाजयुमोच्या उपाध्यक्षाचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. निगडी, यमुनानगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा सर्व भटके कुत्री महापालिकेतील अधिका-यांच्या कार्यालयाबाहेर बांधण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा उपाध्यक्ष आदित्य कुलकर्णी यांनी दिला आहे.

एका पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी (दि.24)  रुपीनगर परिसरात उच्छाद मांडला. सुमारे वीस जणांना कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. लहान मुले घराच्या अंगणात खेळत असताना त्यांच्यावर झडप घालून कुत्र्याने चावा घेतला आहे.  त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

निगडी, यमुनानगर परिसरात देखील भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली असून त्याचा त्रास इथल्या नागरिकांना होत आहे. अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.  मध्यरात्री कुत्री किंचाळत असल्याने झोपेचे अवघड केलेले आहे. त्यामुळे लवकरात -लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा महापालिकेतील अधिका-यांच्या कार्यालयाबाहेर कुत्री बांधण्याचा इशारा  कुलकर्णी यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.