Nigdi News : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रक्तदान शिबिरात 96 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तपेढ्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात आयोजित रक्तदान शिबिरात 96 जणांनी रक्तदान केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी चिंचवड जिल्हा, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, श्री शंकर महाराज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवारी, दि.25) हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

श्रीहरी धर्माधिकारी, संभाजी बालघरे व भास्कर रिकामे यांनी शिबिराचे संयोजन केले. दिपक पंडीत, हेमंत वडाळे, दिपक नलावडे व डॉ. अविनाश वैद्य यांनी या शिबिराचे व्यवस्थापन पाहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे यांच्या उपस्थितीत रक्तदात्यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.