Nigdi News : निगडीतील चेतन परदेशी यांना 2017-18 चा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान

शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कामाची दखल

एमपीसी न्यूज – शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या निगडीतील चेतन परदेशी यांना 2017-18 चा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते दिल्लीत (गुरूवारी, दि.12) हा पुरस्कार देण्यात आला.

चेतन यांनी ‘SforSchools’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शाळा गळतीचे प्रमाण कमी केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी फिरते ग्रंथालय सुरु केले आहे. त्यांना डिसेंबर 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र स्वयंसेवक पुरस्कार देखील देण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते 2017-18 आणि 2018-19 चे राष्ट्रीय युवा पुरस्काराचे विज्ञान भवन, दिल्ली येथे वाटप करण्यात आले. यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या भारतासाठीच्या निवासी प्रतिनिधी डेयरड्रे बॉइड उपस्थित होत्या.

चेतन परदेशी हे ‘एस फॉर स्कूल’ चे संस्थापक आहेत ही संस्था 1900 हून अधिक (1940) विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यात यशस्वी झाली आहे. याशिवाय फिरते ग्रंथालय आणि मार्गदर्शकांची भेट असे उपक्रम ही संस्था राबवते. 3 हजार 830 विद्यार्थ्यांना पुस्तके व स्टेशनरी मिळाली आहेत तर, 19 शाळांमध्ये मोबाईल ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांत त्यांच्या कामाचा विस्तार झाला आहे. संस्थेचे उपक्रम घेऊन ही संस्था सहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली आहे.

तसेच, चेतन परदेशी यांच्या कामाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्राच्या वतीने त्यांना संयुक्त राष्ट्र स्वयंसेवक डिसेंबर 2020 मध्ये देण्यात आला होता. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP), केंद्रिय युवा व क्रीडा मंत्रालय आणि भारत सरकारच्या सहयोगाने हा पुरस्कार देण्यात येतो.

चेतन परदेशी यांची ‘एमपीसी न्यूज’ने खास मुलाखत घेतली होती. त्यांच्या बद्दल तसेच त्यांच्या कामाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर जा.

Nigdi News : शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या चेतन परदेशीला संयुक्त राष्ट्र स्वयंसेवक पुरस्कार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.