Nigdi News: पादचारी महिलेचे 70 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री सात वाजताच्या सुमारास प्राधिकरण निगडी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री सात वाजताच्या सुमारास प्राधिकरण निगडी येथे आयसीआयसीआय बँक ते पोस्ट ऑफिस या मार्गावरून पायी चालत जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 70 हजारांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.