Nigdi : जुन्या महामार्गावरील भुयारी पादचारी मार्गाला कै. लक्ष्मण जगताप यांचे नाव देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मधुकर पवळे ( Nigdi )  उड्डाणपुलाजवळ निगडी येथे पालिकेकडून भुयारी पादचारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या भुयारी मार्गाला कै. लक्ष्मण जगताप यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे. त्याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळ पादचारी नागरिक महामार्ग ओलांडत असत. त्यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात झाले होते. भुयारी मार्गाची गरज लक्षात घेत महापालिकेने या ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग तयार केला. हा मार्ग तयार करण्यासाठी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक कालावधी लागला. दोन वेळा मुदत वाढवून दिल्यानंतर आता या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Pune : यशस्वी उद्योगासाठी गुणवत्ता, ग्राहककेंद्री दृष्टीकोन गरजेचा

सतत होणारे अपघात लक्षात घेत प्रशासनाने जुन्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवल्या होत्या. त्यामुळे पादचारी नागरिकांना एक ते दीड किलोमीटर वळसा घालून जावे लागत होते. या भुयारी मार्ग सुरु झाल्यास नागरिकांची पायपीट थांबणार आहे. पालिकेने हा भुयारी मार्ग नागरिकांसाठी लवकरात लवकर सुरु करावा. भुयारी मार्गामध्ये सीसीटीव्ही आणि पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी कै. लक्ष्मण जगताप यांनी योगदान दिले आहे. त्यामुळे या भुयारी मार्गाला त्यांचे नाव देण्याची मागणी सचिन काळभोर यांनी केली ( Nigdi ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.