Alandi News: आळंदी ग्रामीण रुग्णालयातून नऊ बॅट-या चोरीला

एमपीसी न्यूज – आळंदी ग्रामीण रुग्णालयातून अज्ञात चोरट्यांनी 27 हजार रुपये किमतीच्या बॅट-या चोरीला गेल्या आहेत. हा प्रकार रविवारी (दि. 26) रात्री उघडकीस आला आहे.

वैद्यकीय अधीक्षक गणपत गेनूजी जाधव यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 27) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आळंदी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करतात. ग्रामीण रुग्णालयाच्या जिन्याखाली 12 वोल्टच्या नऊ युपीएस इन्व्हर्टर बॅट-या ठेवल्या होत्या. 4 मार्च ते 26 डिसेंबर 2021 या कालावधीत अज्ञात चोरटयांनी जिन्याखालून 27 हजारांच्या बॅट-या वैद्यकीय अधीक्षकांच्या परवानगीशिवाय चोरून नेल्या. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.