Pune News : रामटेकडी परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद

एमपीसी न्यूज –  रामटेकडी, हडपसर गावठाण, फुरसुंगी ससाणेनगर व आसपासच्या परिसरात येत्या गुरुवारी (दि.2) पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. (Pune News) रामटेकडी ते खराडी भागात पाईप लाईनवर फ्लो मीटर बसवायचा असल्याने हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे राम टेकडी GSR या भागातील ससणे नगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी SRPF, AIPT, रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, भारत फोर्स कंपनी, एरिया महमदवाडी, हांडेवाडी, रोड, गोंधळेनगर, माळवाडी, भोसले गार्डन, 15 नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा सिटी, मुंडवाघाव, केशवनगर, भीमनगर, शिंदे वस्ती, शिर्के कंपनी, काळेपडळ, गाडीतळ, वैदुवाडी, हडपसर, हेवन पार्क, भारत फोर्स कंपनी एरिया या भागात गुरुवारी पाणी पुरवठा होणार नाही.

Pune News : पाण्याच्या तक्रारीसाठी पुणे महापालिकेकडून 24 तास हेल्पलाईन नंबर जाहीर

तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि.3) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेत सहकार्य करावे असे आवाहन पुणे माहापिलकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.