Pune News : शिवाजीनगर, कोथरूड परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळील पाण्याची मुख्य वितरण नलिका मेट्रोच्या कामामुळे स्थलांतरित करण्याचे काम येत्या गुरुवारी (5 जानेवारी) करण्यात येणार आहे. तसेच चांदणी चौक येथे प्रथमेश सोसायटी लगत कोथरूड भागाला पाणीपुरवठा करणारी (Pune News) सोळा इंच जलवाहिनी दुरुस्तीची कामे गुरुवारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोथरूड आणि शिवाजीनगर भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी (6 जानेवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

शिवाजीनगर, कामगार पुतळा परिसर, शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, कपोते गल्ली, सिमला ऑफीस परिसर, नरवीर तानाजी वाडी, पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, पाटील इस्टेट, कोथरूड भागातील शास्त्रीनगर, लोकमान्य कॉलनी, डावी आणि उजवी भुसारी कॉलनी, वेद भवन रस्ता परिसर, डुक्करखिंड, हिलव्ह्यूव्ह सोसायटी, वूडस् रॉयल सोसायटी परिसर, परमहंसनगर, लक्ष्मीनगर परिसर, राहुल टॉवर, मुठेश्वर कॉलनी, गुरूजन सोसायटी या भागाचा पाणीपुरठा गुरुवारी बंद राहणार आहे.

Pune News : मुलींच्या पहिल्या शाळेचे स्मारक उभारावे या मागणीसाठी बाबा आढाव यांचे पुण्यात लाक्षणिक उपोषण

तर सकाळनगर, औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव, बाणेर रस्ता, पंचवटी, पाषाण, निम्हण मळा, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाणाचा काही भाग, चव्हाणनगर, पोलीस वसाहत, अभिमान श्री सोसायटी, आंबेडकर चौक ते गोकुळी भोईटे वस्तीपर्यंतचा भाग, राजभवन, भोसलेनगर, (Pune News) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंतचा परिसर, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज परिसर, आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंतचा भाग, बाणेर, बोपोडी इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.