Nigdi News : नॉव्हेल्स एनआयबीआर हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर घोडदौड

युएस, फ्रान्स, मलेशिया मध्ये विद्यार्थ्यांना मिळाल्या नोकऱ्या

एमपीसी न्यूज – नॉव्हेल्स एन आय बी आर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, निगडी, पुणे येथील विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर निवड झाली. जागतिक पातळीवर यशस्वी घोडदौड झाली. युएस, फ्रान्स, मलेशिया मध्ये विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

यु एस जे वन व्हिसा मिळून एक वर्षाच्या इंटर्नशिपसाठी शोएब शेख या पदवी उत्तीर्ण विदयार्थ्याची फ्रंट ऑफिस डिपार्टमेंट (एम्बसी सुट्स , अटलांटा, युएसए ) व सुमित जगदाळे, केदार होनप या दोन विदयार्थ्यांची फूड प्रोडक्शन डिपार्टमेंट ( पाइनहर्स्ट, नॉर्थ कारोलिना, युएसए ) येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एक वर्षाच्या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे.

बीएस्सी.एच. एस हॉटेल मॅनेजमेंट पदवी या अभ्यासक्रमाचे द्वितीय वर्षाचे विदयार्थी कौशिक पुरोहित व अक्षय शेलार यांची एफ अँड बी सर्विस डिपार्टमेंट ( ल’ अटेलिअर, फ्रान्स ) तर जयेश चव्हाण, यश गौडा, अनिकेत बनसोडे, सम्यक जगताप या विद्यार्थ्यांची एफ अँड बी सर्विस डिपार्टमेंट ( इस्टईन, मलेशिया ) येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिन्याच्या इंटर्नशिपसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना संस्थापक अमित गोरखे म्हणाले कि, इंटर्नशिप प्रोग्राम हा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीजचा असा रस्ता आहे की जो तुम्हांला यशाकडे घेऊन जातो. फक्त तुमच्याकडे या मार्गावरुन जाण्यासाठी जिद्द व चिकाटी हवी. मुलांना त्यांच्या पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य वैभव फंड विदयार्थ्यांना संबोधित करतांना म्हणाले की, भारतात किंवा भारताबाहेरील कुठलाही इंटर्नशिप प्रोग्राम हा तुमच्यासाठी मौलीक अनुभव देणारा असतो. त्यातून तुम्हांला तुमच्यातील क्षमता, मग ती शारीरिक असो किंवा मानसिक उमजून येते. मुलांच्या ह्या सगळ्या प्रवासात त्यांना विस्डम करिअर एज्युकेशनचे डायरेक्टर श्री. सचिन शेंडगे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रोफेसर शंतनू देशपांडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांनी त्यांच्या ह्या प्रवासातील स्वतःचे अनुभव सांगून परदेशी इंटर्नशिप मिळाल्याबद्दल कॉलेजचे संस्थापक अमित गोरखे, प्राचार्य वैभव फंड व विस्डम करिअर एज्युकेशनचे डायरेक्टर सचिन शेंडगे यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.