Kiwale Crime News : संशयातून पतीकडून पत्नीच्या खूनाचा प्रयत्न, आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

एमपीसी न्यूज – संशयातून पतीने पत्नीच्या खून करण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. आज (दि.28) सकाळी किवळे परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी पती विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो अटक आहे.

अमोल थोरात (वय 27) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, संशयातून आरोपी अमोल थोरात याने आपल्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो स्वत: चिंचवड पोलीस ठाण्यात हजर झाला. चिंचवड पोलिसांनी आरोपीला देहुरोड पोलिसांच्या ताब्यात दिले व तिथे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी दारूची नशा करतो अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.