Kolhapur Vidhansabha Election : तुम्ही उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाचे मतदार आहात का? तुमच्यासाठी आहे सुट्टीची बातमी, वाचा…

उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना 12 एप्रिल रोजी सुट्टी

एमपीसी न्यूज – तुम्ही जर उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार असाल तर 12 एप्रिल रोजी मतदानासाठी तुम्हाला एक दिवस सुट्टी मिळणार आहे, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांनी राजपत्राद्वारे जाहीर केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या रिक्त असलेल्या जागी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने कोल्हापूर मतदारसंघात 12 एप्रिल 2022 रोजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्य शासनाकडे सोपविलेल्या अधिकाराचा वापर करून मंगळवार (दि. 12) रोजी 276 – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ही सार्वजनिक सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदारसंघाच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असेल. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू असेल, असे उपसचिवांनी दिलेल्या राजपत्रात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.